पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून; बजेट, तिहेरी तलाक अजेंड्यावर

संसद भवन

१७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरू होत आहे. लोकसभेत पहिले दोन दिवस नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाईल. तत्पूर्वी, हंगामी सभापतिपदी खासदार वीरेंद्र कुमार यांची नियुक्ती होईल. त्यानंतर १९ जूनला लोकसभा सभापतींची निवड होईल. २० जूनला राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. २० जूनपासूनच राज्यसभेचे अधिवेशन सुरू होईल. संसदेचे हे अधिवेशन २६ जुलैपर्यंत चालेल. त्यात तीन तलाकसह अनेक महत्त्वाची विधेयके सादर केली जातील. या अधिवेशनात मागील सरकारच्या वेळी लागू १० अध्यादेश रद्द करून त्यांच्या जागेवर नवीन विधेयके मंजूर करणे गरजेचे आहे. तसेच मागील लोकसभेबरोबरच रद्द झालेली ४६ विधेयकेही बदल करून आणली जातील. पहिल्यांदाच महिला अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील. ५ जुलै रोजी ते सादर केले जाणार आहे.  

राम मंदिरासाठी अध्यादेश हीच आमची इच्छाः उद्धव ठाकरे

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या अधिवेशनाआधी रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. बैठकीला सर्व पक्षीय नेते हजर होते. मोदी म्हणाले की, निवडणुकीत सर्व जण विविध मुद्दे घेऊन गेले. लोकांनी जनादेश दिला आहे. आता सर्व प्रतिनिधी संपूर्ण देशाचे प्रतिनिधी होतात. नव्या विचारांसह नव्या भारताची निर्मिती व्हावी, अशी आमची इच्छा आहे. 

 

देशाची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य'