पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढा: राष्ट्रपतींच्या पत्नीचाही पुढाकार, गरिबांसाठी तयार केले मास्क

राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद

देशावर कोरोनाचे संकट आहे. अशामध्ये कोरोनापासून स्वत:चा आणि इतरांचा बचाव करण्यासाठी सर्व जण प्रयत्न करत आहेत. सरकारपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्व जण कोरोनाविरोधातील लढाईमध्ये आपले योगदान देत आहे. अशातच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी देखील कोरोनाविरोधातील लढाईत पुढाकार घेतला आहे. गरिबांसाठी त्या स्वत: मास्क तयार करत आहेत. 

देशातल्या या ३ शहरांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

सविता कोविंद यांनी बुधवारी कोरोनाविरोधातील लढाईत सहभागी होत आपले योगदान दिले आहे. राष्ट्रपती इस्टेटमधील शक्ती हाटमध्ये मास्क तयार करत त्यांनी संदेश दिला आहे की, या संकटाच्या वेळी सर्वांनी एकमेकांना साथ देत कोरोनाला हरवू शकतो. मास्क तयार करत असताना सविता कोविंद यांनी स्वत: मास्क लावल्याचे पहायला मिळत आहे. 

हेड कॉन्स्टेबलला दाखल करुन घेण्यास ४ रुग्णालयांचा नकार

शक्ती हाट येथे तयार केलेले मास्क 'दिल्ली अर्बन आश्रय सुधार बोर्ड'च्या वेगवेगळ्या निवारा गृहांमध्ये वितरित केले जातात. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करा असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. याआधी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबियांनी मास्क तयार करत कोरोनाविरोधातील लढाईत योगदान दिले आहे. 

राज्यातील केवळ पाच शहरे हॉटस्पॉट, राजेश टोपेंची आश्वासक माहिती