पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत-पाक सीमेवर तैनात होणार लष्कराचे पहिले इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप

भारत-पाक सीमेवर तैनात होणार लष्कराचे पहिले इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप (ANI Photo)

जम्मू-काश्मीरबाबत भारत सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानबरोबर तणावाचे वातावरण आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तान सीमेवर इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप (आयबीजी) तैनात करण्याची संपूर्ण तयारी केली आहे. यावर्षीच्या अखेरीपर्यंत भारतीय लष्कर ३,३२३ किमी लांब भारत-पाक सीमेवर इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप तैनात करणार आहे. भारतीय लष्कराने आपल्या पश्चिम आणि पूर्व सीमेच्या सुरक्षेसाठी ११ ते १३ इंटिग्रेटेड ग्रुप तयार करणे आणि तैनात करण्याची योजना बनवली आखल्याची माहिती लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी दिली. 

पाकसाठी बिगरमुस्लिम करतात सर्वाधिक गुप्तहेरीः दिग्विजय सिंह

हिमाचल प्रदेशातील योल येथे स्थित असलेल्या IX कॉर्प्सच्या पुनर्रचनेस संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. पश्चिम सीमेवर तैनात करता यावे यासाठी यातूनच आयबीजी तयार करण्यात आले आहे. २००९ मध्ये उभारण्यात आलेली IX कॉर्प्स लष्कराची सर्वांत युवा शाखा असून ती हरयाणातील चंडीमंदिर स्थित पश्चिम सेनेच्या कमांडचा एक भाग आहे.

पाकिस्तानचा कुटील डाव निष्फळ ठरवण्यासाठी इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स तयार करण्यात आले आहे. लष्कराची ही सर्वांत मोठी पुनर्रचना असून लष्कर प्रमुख बिपिन रावत हे त्याचे प्रस्तावक आहेत. आयबीजीचे लक्ष्य हे विविध प्रभागांना एका नव्या समूहात सामील करणे आहे. यामध्ये तोफ, टँक, हवाई रक्षा आदींचा समावेश असेल. यातून युद्धासाठी संपूर्णपणे तयार युनिट करण्याची शक्यता आहे.

लालूप्रसाद यांची प्रकृती बिघडली, केवळ ३७ टक्के किडनीचे काम सुरु

ही लष्कराच्या जुन्या युद्धाच्या पद्धतीपेक्षा वेगळे असेल. युद्धासारख्या परिस्थितीत शत्रुशी निपटण्यासाठी इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप खूप उपयोगी ठरेल. प्रत्येक आयबीजीमध्ये किमान तीन ब्रिगेड सहभागी असतील. सामान्यपणे आयबीजीचा आकार छोटा असेल आणि लढाईसाठी आवश्यक सर्व शस्त्रास्त्रे आणि जवानांनी परिपूर्ण असेल. त्यांच्याकडे हवाई शक्ती, रणगाडे आदि असतील. जेथे आयबीजी तैनात असेल त्या प्रत्येक ब्रिगेडमध्ये ६ ते ८ बटालियन असतील.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयबीजीमध्ये सुमारे २० ते २५ हजार जवानांचा समावेश असेल. प्रत्येक आयबीजी एक स्वयंपूर्ण फायटिंग युनिट असेल.