पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरः अपहरण करुन दहशतवाद्यांनी केली एकाची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेले भारतीय लष्कराचे जवान(संग्रहित छायाचित्र)

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सोमवारी संशयित दहशतवाद्यांनी दोघा जणांचे अपहरण करुन एकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवल्यानंतर घडलेली अशा प्रकारची ही पहिलीच घटना ठरली आहे. पोलिसांच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्राल परिसरातील राजोरी जिल्ह्यातील रहिवासी अब्दुल कादिर कोहली आणि श्रीनगरमधील खोनमोह येथील मंजूर अहमद यांचे काही बंदुकधाऱ्यांनी अपहरण केले.

ब्रिटन पंतप्रधानांना मोदींकडून समजली अ‍ॅशेसची विशेष न्यूज

दरम्यान, तपासपथकाला कोहली नावाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरु आहे.

VIDEO : मोदी-ट्रम्प यांच्या भेटीतील 'दे टाळी' क्षण

केंद्र सरकारने ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून त्याची दोन केंद्रशासित प्रदेशात विभागणी केल्यानंतरचा हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे. तत्पूर्वी, २० ऑगस्ट रोजी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. यात एक विशेष पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर एक पोलिस उपनिरीक्षक जखमी झाला होता. सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये ५ ऑगस्ट नंतरची ही पहिलची चकमक होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:first incident after jammu kashmir special status removed terrorists Killed One of the two persons who was abducted from TRAL