पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्मला सीतारामण देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री

निर्मला सीतारामण

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुरुवातीला वाणिज्य आणि उद्योग मंत्री नंतर संरक्षण मंत्रालय सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामण यांच्याकडे आता अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थ मंत्री झाल्या आहेत. पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी १९७०-७१ दरम्यान अर्थ मंत्रालयाचा कारभार पाहिला होता. पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री होण्याचा मान ही सीतारामण यांनाच मिळालेला आहे. यातही त्यांच्याआधी इंदिरा गांधी यांचेच नाव येते. 

मोदींच्या मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांना महत्वाची जबाबदारी

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात निर्मला सीतारामण यांच्याकडे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी स्वतंत्र प्रभाराच्या रुपात सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली आणि त्यांना संरक्षण मंत्री करण्यात आले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या कार्यकाळात त्यांना अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. 

निर्मला सीतारामण यांचा जन्म तामिळनाडूतील एका सर्वसाधारण कुटुंबात १८ ऑगस्ट १९५९ रोजी झाला होता. त्यांचे वडील रेल्वेत काम करत होते आणि आई गृहिणी होती. वडिलांची सातत्याने बदली होत असत. त्यामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात त्यांनी वास्तव्य केले.

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील १० प्रमुख चेहरे

सीतारामण यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथून केले. त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतला होती. त्यानंतर पदव्युत्तर पदवीसाठी त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांनी इंडो-यूरोपियन टेक्सटाइल ट्रेडमध्ये पीएच.डी केली. 

निर्मला सीतारामण यांनी २००८ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि भाजपमध्ये सक्रिय झाल्या. त्यानंतर २ वर्षांतच त्या भाजपच्या प्रवक्त्या बनल्या. २६ मे २०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपद सोपवण्यात आले. त्या पुन्हा ३ डिसेंबर २०१७ रोजी कॅबिनेटच्या फेरबदलात संरक्षण मंत्री झाल्या.