पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऐतिहासिक क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पहिल्या खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्सचे उद्घाटन केले. हा क्षण भारतीय क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक असल्याचे मोदींनी म्हटले आहे. मी जरी तुमच्यासोबत तंत्रज्ञानाच्या साहय्याने जोडलो गेलो असलो तरी स्पर्धेसाठीचा माहोल, उत्साह आणि ऊर्जा ही कमालीची असल्याचे मला जाणवत आहे. ओडिसा या घटनेने इतिहासाचा साक्षीदार झाला आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्सची सुरुवात होत आहे, ही मोठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.  

या क्रिकेटरला पाकचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

मोदी म्हणाले की, मागील पाच-सहा वर्षांपासून भारतामध्ये खेळाला अधिक प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरु आहे. खेळाडूंमधील क्षमता ओळखणे, त्यांना प्रशिक्षण देणे, निवड प्रक्रिया या सर्वच बाबींवर उत्तम काम केले जात आहे. स्पर्धेत उत्तम कामगिरी करुन अधिक पदके मिळवणे एवढाच स्पर्धेचा उद्देश नसून स्वत:च्या कामगिरीत सुधारणा करुन स्वत:च्या सामर्थ्याला एक नवी उंची देणे हे देखील यातून साध्य करायचे आहे, असा संदेशही मोदींनी स्पर्धकांना दिला.   
भुवनेश्वर आणि कटक येथे २२ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान  'खेलो इंडिया गेम्स'चे आयोजन करण्यात आले आहे.

तब्बल ७० दिवसांनी शाहिन बागमधील एक रस्ता खुला झाला, पण...

यात देशातील खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. यूनिवर्सिटी गेम्सचे आयोजन भारतीय खेळ प्राधिकरण (साई), भारतीय विश्वविद्यालय संघ, राष्ट्रीय खेळ महांसघ आणि भारतीय ऑलिम्पिक संघ (आयओए) च्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे.  'खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स'मध्ये १७७ यूनिवर्सिटीमधून जवळपास  ३ हजार ३४० स्पर्धेकांनी भाग घेतला असून यात १ हजार ७३८ पुरुष आणि १ हजार ६०५ महिला स्पर्धकांचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १४५ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:First ever Khelo India University Games is a historic moment for Indian sports says Prime Minister Narendra Modi watch video