पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ

बिपीन रावत

भारतीय लष्कर प्रमुखाची जबाबदारी सक्षमपणे पेलणाऱ्या  जनरल बिपीन रावत यांची सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरला बिपीन रावत लष्कर प्रमुख पदावरुन निवृत्त होत आहेत. पुण्याचे मराठमोळे अधिकारी मनोज मुकुंद नरवणे त्यांचा पदभार हाती घेतील.

केंद्र सरकारने रविवारी सीडीएसच्या पदाची वयोमर्यादा वाढवली होती. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन सलग सहाव्यांदा भारतवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) हे नवे पद निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. सर्वाधिक अनुभवाच्या जोरावर त्यांची या पदावर वर्णी लागली आहे. सीडीएस पदाधिकारी लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्यामध्ये समन्वयाची जबाबदारी पार पाडताना दिसणार आहेत.

Video: CAA समर्थनासाठी PM मोदींनी शेअर केला 'आध्यात्मिक गुरुमंत्र'

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) कशासाठी? 

कारगिलच्या युद्धावेळी भारतीय हवाई दल आणि लष्कर यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले होते. युद्धजन्य परिस्थितीवेळी निर्णयाबद्दल हवाई दलाचे तत्कालीन वायुसेनाध्यक्ष आणि लष्कर प्रमुख जनरल व्ही पी मलिक यांची मते वेगवेगळी होती. याची खूप चर्चा देखील झाली. त्यानंतर तिन्ही दलामध्ये समन्वय साधण्यासाठी सीडीएस स्थापनेची शिफारस करण्यात आली होती. परंतु राजकीय पक्ष आणि लष्कर यांच्यात या मुद्यावर एकमत झाले नाही. एका व्यक्तीकडे सर्व सैन्यशक्ती केंद्रीत होणे योग्य ठरणार नाही, असा युक्तीवादही रंगला होता.  

यूपी पोलिसांनी अराजकता पसरवली,प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

२०१२ मध्ये नरेश चंद्र समितीने यासंदर्भातील शिफारस केली होती. सध्याच्या घडीला लष्कराच्या तिन्ही दलाच्या समन्वयासाठी चीफ ऑफ स्टाफ समिती (सीओएससी) कार्यरत आहे. या समितीच्या अध्यक्षाच्या नियुक्तीतून अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. यासंदर्भात डीबी शेतकर समितिने डिसेंबर २०१६ मध्ये मोदी सरकारला आपला अहवाल सादर केला होता. या समितीने ९९ शिफारशीसह सीडीएस नियुक्तीचा मुद्दा मांडण्यात आला होता.