पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जामिया गोळीबाराच्या घटनेनंतर प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा

प्रियांका गांधी

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठापासून ते राजघाटापर्यंत गुरुवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान एका तरुणाने गोळीबार केला. याप्रकरणावरुन काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी गोळ्या मारायला प्रवृत्त केले तर असेच होणार, अशी टीका प्रियांका गांधींनी केली आहे.

जामिया परिसरात तरुणाचा गोळीबार, एक जण जखमी

प्रियांका गांधी यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की,  'भाजप सरकारचे मंत्री आणि नेते लोकांना गोळ्या घालवण्यासाठी प्रवृत्त करतील तसंच भडकाऊ भाषण करतील तर असे होणे शक्य आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या प्रकारची दिल्ली बनवायची आहे याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे त्यांनी सांगितले. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोन प्रश्न विचारले आहेत. ते हिंसेसोबत उभे आहेत का अहिंसे सोबत उभे आहेत? आणि ते विकासासोबत उभे आहेत की अराजकतेसोबत उभे आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. 

जामिया परिसरातील गोळीबाराच्या घटनेवर अमित शहा म्हणाले...

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीतील जामिया परिसरात निघणाऱ्या मोर्चापूर्वी एका तरूणाने आपल्या हातातील पिस्तूलाने एका विद्यार्थ्यावर गोळीबार केला. या गोळीबारात तो विद्यार्थी जखमी झाला आहे. ये लो आझादी असेही हा तरूण जोरजोरात ओरडत होता. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. हा तरूण हातातील पिस्तूल इतरांच्या दिशेने रोखत निघाला होता. गोळीबार करण्यात आलेला तरूण जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार करण्यात सुरु आहेत.

निवडणूक आयोगाचा दणका; अनुराग ठाकूर यांना प्रचार करण्यास बंदी