पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली अग्नितांडव: त्याच इमारतीला पुन्हा लागली आग

दिल्लीत इमारतीला आग

दिल्लीमध्ये रविवारी ज्या इमारतीला आग लागून ४३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्याच इमारतीला सोमवारी सकाळी पुन्हा आग लागली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दिल्ली पोलिसांनी या इमारतीचा मालक आणि व्यवस्थापकाला रविवारी अटक केली. इमारतीचा मालक रेहान याच्याविरोधात ३०४ आणि २८५ कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित शहा लोकसभेत मांडणार नागरिकत्व दुरुस्ती विधेयक

दिल्लीच्या राणी झाशी रोडवर असलेल्या धान्य बाजार येथील चार मजली इमारतीला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीमध्ये ४३ मजूरांचा मृत्यू झाला तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आगीमधून ५६ जणांना वाचवण्यात आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अग्निशमन दलाच्या ३० गाड्या आणि १५० कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली. 

उन्नाव बलात्कार प्रकरण: सात पोलिसांचे निलंबन

या इमारतीमध्ये प्लास्टिकच्या वस्तू, बॅग, टोपी बनवण्याच्या कंपन्या होत्या. या कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार याठिकाणीच राहत होते. पहाटेच्या सुमारास अचानक इमारतीला आग लागली त्यावेळी सर्व कामगार झोपलेले होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला. मृतांच्या मृतदेहावर सोमवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दिल्ली सरकारने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ७ दिवसांच्या आत याप्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

धक्कादायक! बिहारमध्ये विद्यार्थिनिला घरात घुसून जिवंत जाळले