पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कराची-रावळपिंडी एक्स्प्रेसला भीषण आग; ७३ प्रवाशांचा मृत्यू

कराची एक्स्प्रेसला भीषण आग

पाकिस्तानमध्ये कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेमध्ये ७३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ३० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. सिलेंडच्या स्फोटामुळे एक्स्प्रेसला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. 

सत्तापदांच्या समान वाटपासाठी शिवसेना आग्रही, लढत राहण्याचे वचन

मिळालेल्या माहितीनुसार, कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला गुरुवारी सकाळी आग लागली. रहीम यार खान रेल्वे स्टेशनजवळील लियाकतपूर येथे एक्स्प्रेस पोहचली असता एका डब्याला आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे प्रवाशांना स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बाहेर पडता आले नाही. ज्यावेळी ही घटना घडली त्यामुळे एक्स्प्रेसमधील सर्व प्रवासी झोपले होते. ज्यावेळी गाडीला आग लागली त्यावेळी अनेकांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. या आगीमध्ये तीन डबे जळून खाक झाले आहेत. 

७२ वर्षाचा इतिहास बदलला; जम्मू-काश्मीर, लडाख नवे केंद्रशासित प्रदेश

या दुर्घटनेमध्ये ७३ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ३० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना मुल्तानच्या बीवीएच बहावलपूर रुग्णालय आणि पाकिस्तान-इटालियन मॉर्डन बर्न सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 

मोदींनी घेतली त्यांच्या मातोश्रींची भेट

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. तसंच जखमींना ताबडतोबत चांगले उपचार देण्यात यावेत असे निर्देश दिले आहेत. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री राशिद यांनी देखील या घटनेनंतर दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. क्षतिग्रस्त रेल्वे ट्रॅक पुढील काही तासात सुरु करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. 

ज्यांच्या मनात पाप तेच सत्तेसाठी पर्यायांबद्दल बोलतात - संजय राऊत