पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत ४ मजली इमारतीला भीषण आग, ४३ जणांचा मृत्यू

दिल्लीत ४ मजली इमारतीला भीषण आग, ३२ जणांचा मृत्यू (ANI)

दिल्लीतील धान्य बाजार परिसरातील एका चार मजली इमारतीला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत ४३ जणांचा मृत्यू झाला. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या सुमारे ३० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून ५० हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मृतांच्या नातेवाईकांना दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारनेही मदत जाहीर केली आहे. मृतांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या कामगार वर्गाचा समावेश आहे. सर्वजण झोपेत असल्यामुळे मृतांचा आकडा वाढला आहे. तसेच निमुळत्या गल्ल्यांमुळे मदतकार्य राबवण्यात अग्निशामक दलाला अडचणींचा सामना करावा लागला.

अग्निशामक दलाला पहाटे ५.२२ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्वरीत अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले. जखमींना एलएनजेपी आणि हिंदू राव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोरकुमार यांनी डॉक्टरांचे पथक जखमींवर उपचार करत असल्याचे सांगितले.

अजित पवारांनीच सरकार स्थापण्यासाठी संपर्क केला, फडणवीसांचा गौप्यस्फोट

दिल्ली अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी अतुल गर्ग हेही घटनास्थळी दाखल झाले होते. आतापर्यंत ५० लोकांना वाचवण्यात आले असून बहुतांश लोक धुरामुळे होरपळले आहेत.