पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीमध्ये रुग्णालयाला भीषण आग; बचावकार्य युध्दपातळीवर सुरु

दिल्लीत रुग्णालयात आग

दिल्लीतील नोएडामध्ये एका रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ईएसआयसी या रुग्णालयात गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. नोओडाच्या सेक्टर २४ मध्ये ही घटना घडली आहे.

पंढरपुरात मठाधिपतींच्या हत्येनंतर तपासात धक्कादायक माहिती उघड

ईएसआयसी रुग्णालयामध्ये सकाळी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. आग लागल्याचे कळताच रुग्णालयामध्ये एकच खळबळ उडाली. रुग्ण आणि डॉक्टरांनी रुग्णालयाबाहेर धाव घेतली. मात्र रुग्णालयात अडकलेल्या डॉक्टर आणि रुग्णांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहे. रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

लग्नाला नकार दिला म्हणून त्याने तिचा खून केला आणि नंतर...