दिल्लीमध्ये इमारतीला आग लागून ४३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आणखी एक आग लागल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील मुंडका भागामध्ये लाकडाच्या वखारीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी पहाटे अचानक वखारीला भीषण आग लागली.
Delhi: Fire breaks out in a godown in Mundka area. 21 fire tenders present at the spot. pic.twitter.com/Omx5IleMav
— ANI (@ANI) December 14, 2019
खडसेंनी जाहीर बोलणं टाळायला हवं होतं- फडणवीस
मिळालेल्या माहितीनुसार, मुंडका मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. तसंच या आगीमध्ये कोणी जखमी झाल्याची माहिती देखील अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या २१ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मी नेहमीच पंकजा यांच्या पाठिशी उभा राहिलोः देवेंद्र फडणवीस
दरम्यान, गेल्या रविवारी दिल्लीमध्ये रानी झांशी मार्गवरील अन्न बाजारातील एका इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये ४३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर १७ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते. तर ५६ जणांना वाचवण्यात यश आले होते.