पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चेन्नईत तेल गोदामाला भीषण आग, अग्निशामक दलाचे ५०० जवान घटनास्थळी

चेन्नईत तेल गोदामाला भीषण आग (ANI)

चेन्नईतील माधवपूरम क्षेत्रातील एका तेल गोदामाला शनिवारी रात्री सायंकाळी अचानक भीषण आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केले असून घटनास्थळी अग्निशामक दलाचे २६ गाड्या दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विषारी वायू पसरण्याचा धोका अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

अग्निशामक दलाचे अधिकार सिलेंद्र बाबू म्हणाले की, आग खूपच भीषण आहे. त्यामुळे अग्निशामक दलाचे ५०० हून अधिक जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाण्याचे २६ बंब, ६ फोमच्या गाड्या आग विझविण्याच्या प्रयत्नात आहेत. गोदामातून मोठ्याप्रमाणात आग बाहेर येत आहे. हे रसायनचे गोदाम होते. या रसायनाचा वापर औषधांसाठी केला जातो. त्यामुळे विषारी वायू पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

आगीचा व्हिडिओ समोर आला असून थोड्या थोड्या वेळाने स्फोट होताना दिसत आहे. धुराचे लोट आकाशात पसरले आहेत. आगीने विक्राळ रुप धारण केले आहे. अद्याप जीवितहानीबाबत समजू शकलेले नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:fire breaks out at an oil warehouse in madhavaram area in chennai 500 firemen 26 fire tenders on the spot