पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रॅपर हार्ड कौर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

हार्ड कौर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योदी आदित्यनाथ आणि संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्याविरोधात टिप्पणी करणं रॅपर आणि गायिका हार्ड कौरला महागात पडलं आहे. तिच्याविरोधात वाराणसीमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. 

भारतीय दंड विधान कलम १२४ अ (राजद्रोह), १५३  अ, ५००, ५०५ अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कलम ६६ चं उल्लंघन केल्याप्रकरणीही  वारणसीमधले वकील शशांक शेखर यांनी पंजाबी गायिका हार्ड कौर विरोधात तक्रार दाखल केली आहे. 

हार्ड कौरनं १७ जून रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्याविरोधात एक पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट आक्षेपार्ह होती. १८ जून रोजी हार्ड कौरनं योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातही वादग्रस्त टीप्पणी केली. मात्र ही वादग्रस्त व्यक्तव्यं करणं हार्ड कौरला महागात पडलं आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:FIR registered against singer Hard Kaur for her comments against Yogi Adityanath and Mohan Bhagwat