दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील तबलीगी समाजाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या ९६० परदेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी या विदेशी नागरिकांविरोधात दिल्ली पोलिस आयुक्त आणि डीजीपींना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. परदेशातून आलेल्या या नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांचे जीवन धोक्यात घातले आहे.
नवी मुंबई: CISFच्या आणखी ६ जवानांना कोरोनाची लागण
तबलीगी समाजाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या ९६० परदेशी नागरिकांना याआधी काळ्या यादीत घालण्यात आले असून त्यांचा पर्यटन व्हिसा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली होती. हे सर्वजण परदेशी पर्यटक व्हिसावर भारतामध्ये येत धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. तर, देशात लॉकडाऊन असताना देखील नियमांचे उल्लंघन करत निजामुद्दीन येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तबलिगी जमात कोरोना विषाणूची फॅक्टरीः विश्व हिंदू परिषद
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलीगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी एकूण ६४७ लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे लोकं देशातील १४ राज्यांमधून आले होते. हे लोकं आसाम, अंदमान आणि निकोबार, दिल्ली, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश येथून आले होते.