पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झुंडबळी प्रकरणी मोदींना पत्र पाठवणाऱ्या ४९ सेलिब्रिटींविरोधात एफआयआर

अनुराग कश्यप

देशभरामध्ये सुरु असलेल्या झुंडबळी प्रकरणावर चिंता व्यक्त करत बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातील सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. याप्रकरणाला आता नवे वळण आले आहे. पत्र लिहिणाऱ्या रामचंद्र गुहा, मणी रत्नम, अपर्णा सेन, अनुराग कश्यप यांच्यासह ४९ जणांविरोधात पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

VIDEO: पाकमध्ये घुसून वायुदलाने असा केला होता बालाकोट एअर स्ट्राईक

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वकील सुधीर कुमार ओझा यांनी यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायाधिश सूर्यकांत तिवारी यांनी दिलेल्या आदेशानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील सुधीर ओझा यांनी सांगितले की, २० ऑगस्ट रोजी कोर्टाने याचिका स्विकारली होती. त्यानंतर आज यासर्वांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सेलिब्रिटींनी देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ओझा यांनी केला आहे.

'शरद पवार माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवताहेत'

दरम्यान, या ४९ सेलिब्रिटींविरोधात देशद्रोह, सार्वजनिक उपद्रव, शांतता भंग करणे, धार्मिक भावना दुखावणे या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सेलिब्रिटींनी जुलैमध्ये पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी देशातील झुंडबळीला आळा घालण्यासाठी कडक कायदा बनवा आणि आरोपींना कडक शिक्षा द्या अशी मागणी केली होती. 

फुशारक्या मारत नाही पण एक लाखाच्या फरकाने मी जिंकेन

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:FIR lodged against 49 celebrities who wrote open letter to pm narendra modi on mob lynching