पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हॉट्सअपवर कोरोनाबाधिताचे नाव टाकले, ग्रूप अ‍ॅडमीनविरोधात गुन्हा दाखल

हेरगिरी प्रकरणावर व्हॉट्स अ‍ॅपचं स्पष्टीकरण

बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांची नावे सोशल मीडियावर सार्वजनिक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अवकाश कुमार यांच्या आदेशानंतर व्हॉट्सअप ग्रूपचा ऍडमिन भवेशकुमार भारतीय, पोलिस पब्लिक मैत्री ग्रूपचा सुबोध कुमार आणि दलित जागरण मंचचा ऍडमिन ओमप्रकाश रजक यांच्यावर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागांत एँटिबॉडी टेस्ट घ्या, ICMR चे निर्देश

दरम्यान, बेगुसराय येथे बुधवारी तपासानंतर एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. सायंकाळी बेगसुराय येथील विविध व्हॉट्सअप ग्रूपवर पीडित रुग्णाचे नाव आणि पत्ता सार्वजनिक करण्यात आला होता. यावरुन पोलिस अधीक्षक अवकाश कुमार यांच्या आदेशानंतर न्यूज टिव्ही ग्रूपचा ऍडमिन भवेश कुमार भारतीय, पोलिस पब्लिक मैत्री ग्रूपचा सुबोध कुमार आणि दलित जागरण मंचचा ऍडमिन ओमप्रकाश रजक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  

लॉकडाऊनः एका आठवड्यात वाढल्या घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी

याबाबत मुख्यालयातील पोलिस उपअधीक्षक कुंदनकुमार सिंह यांनी सांगितले की, सरकारने कोरोना विषाणू बाधिक रुग्णांची विस्तृत माहिती सार्वजनिक केली नाही पाहिजे, असे आदेश दिले आहेत. परंतु, बेगसुराय येथे सरकारी आदेशाला हरताळ फासत तीन व्हॉट्सअप ग्रूपवर रुग्णाचे नाव आणि त्याचा पत्ता सार्वजनिक करण्यात आला. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून छापासत्र सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे या सात शहरांतील घरांच्या विक्रीत होणार घसरण

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:fir against 3 whatsapp group admin who disclose the name and address of covid 19 coronavirus victim in begusarai