पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत : सीतारामन

निर्मला सीतारामन

भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास खडतर सुरु असल्याची चर्चा रंगत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. सितारामन म्हणाल्या की, इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली आहे. जागतिक स्तरावर मागणीत घट झाली आहे. पण याची झळ भारताला बसलेली नाही. अमेरिका आणि युरोपमधील राष्ट्रांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. मंदीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषदेत सरकारची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी अनेक घोषणा देखील केल्या आहेत.  

'जेट'चे संस्थापक नरेश गोयल यांच्या दिल्ली, मुंबईतील कार्यालयांवर छापे

त्या पुढे म्हणाल्या की, सूक्ष्म-लघू-मध्यम अर्थात 'एमएसएमई' उद्योगांना सर्व जूनी थकीत जीएसटी ३० दिवसांत मिळेल, एमएसएमईच्या प्रणालीत संशोधन करुन त्यात सुधारणा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्याच्या घडीला चीन-अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धामुळे जगातील अनेक देश मंदीच्या उंबरठ्यावर आहेत. पण भारतीय अर्थव्यवस्थेतीची स्थिती चीनपेक्षाही चांगली आहे. अर्थव्यवस्थेवर कोणताही विपरित परिणाम होऊ नये यासाठी उत्पादनावर लागू करण्यात येणारा अधिभार कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  

पी. चिदंबरम यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात २६ ऑगस्टला सुनावणी

विजया दशमीच्या मुहूर्तावर आयकर प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असल्याची माहितीही निर्मला सीतारामन यांनी यावेळी दिली. नव्या बदलानुसार एखाद्या व्यक्तीच्या आयकरासंबंधीत माहिती दुसऱ्या राज्यात देखील उपलब्ध असेल. रेपो रेट व्याजदराशी संलग्नित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होईल, असेही त्या म्हणाल्या.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:finance minister nirmala sitharaman said indian economy is in better situation compare to other economy