पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्थसंकल्पात १० वर्षांचे 'व्हिजन': निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन

लोकसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी संवाद साधला. अर्थसंकल्प तयार करताना १० वर्षांचा दृष्टीकोन समोर ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. अर्थसंकल्पात १० वर्षांचे व्हिजन आणि ५ वर्षांचे टारगेट (ध्येय) निश्चित केले आहे. स्टार्टअप्सला कर लाभ देण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात ग्रामीण आणि शहरी भागाबरोबर संपूर्ण समाजाकडे लक्ष देण्यात आल्याचे त्या म्हणाले.

अर्थसंकल्प २०१९: ३ कोटी दुकानदारांना मिळणार पेन्शन

त्यांनी म्हटले की, अर्थव्यवस्थेच्या समग्र विकासावर भर देण्यात आला. आम्ही ग्रामीण भागाला महत्व दिले. त्यामुळे ग्रामीण क्षेत्राला निश्चित गती मिळेल. त्याचबरोबर शहरी जीवन सुलभ सुलभ कसे होईल याकडे लक्ष देण्यात आले आहे. 

बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आमच्या बँकिंग प्रणालीचा एक महत्वाचा घटक आहे. सरकारने एनबीएफसीच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक व्यापक दृष्टीकोन अवलंबला आहे.

हे आहेत अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

बँकांच्या पुनर्मुद्रीकरणासाठी ७० हजार कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर एससी, एसटी आणि गरिबांच्या कल्याणासाठी विशेष तरतुदीत वाढ केली आहे.