पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दोन बायकांमधील भांडणाला वैतागून नवऱ्याने केले घृणास्पद कृत्य

जमशेद आलमला अटक करण्यात आली आहे

दोन बायकांमध्ये सातत्याने होत असलेल्या भांडणाला वैतागून एका नवऱ्याने दोघींची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. जमशेद आलम असे त्याचे नाव आहे.

दोन्ही बायकांची हत्या केल्यानंतर जमशेद बिहारमध्ये त्याच्या गावी पळून गेला होता. त्याने आपल्या १० वर्षांच्या मुलालाही सोबत घेतले होते. परत दिल्लीला आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. दक्षिण पूर्व दिल्लीमधील जैतपूर गावात जमशेदचे कुटुंब राहात होते. घरातून दुर्गंधी येत असल्याचे शेजारच्या लोकांनी पोलिसांना कळविल्यावर या ठिकाणी शोध घेण्यात आला होता. मागच्या गुरुवारीच या घरात दोन मृतदेह आढळून आले होते. तेव्हापासून पोलिस आरोपीचा शोध घेत होते.

मालाड दुर्घटनेतील मृतांची संख्या २३, आणखी एक मृतदेह बाहेर काढला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमशेद आलम या ठिकाणी भाड्याने राहात होता. त्याला परवीन (३४) आणि जबीना (४५) अशा दोन पत्नी होत्या. दोघींमध्ये सातत्याने भांडणे होत असल्यामुळे जमशेद वैतागला होता. गेल्या गुरुवारी त्याने आधी परवीनचा खून केला. त्यावेळी जबीनाने हे सर्व बघितले. त्याने जबीनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिने विरोध केल्यावर त्याने जबीनाचा पण खून केला. ही घटना घडली, त्यावेळी त्याचा मुलगा घराबाहेर खेळत होता. तो मुलाला सोबत घेऊन बिहारला निघून गेला.