पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लग्नानंतर अवघ्या तीन दिवसातच जोडप्याची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

तेलंगणा येथील एका प्रेमी युगुलाने लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आतच आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणामधील यादद्रि-भोंगिर जिल्ह्यात राहणाऱ्या एका प्रेमी जोडप्याने लग्नानंतर तीन दिवसांच्या आतच आत्महत्या केली. आपला विवाह कुटुंबीय स्वीकारतील किंवा नाही, या भीतीपोटी या दोघांनी आत्महत्या केली, असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पाकचा तो डाव फसणार अन् डोकेदुखी कायम राहणार

वालीगोंडा ब्लॉकमधील जंगरेड्डीपल्ली गावातील २३ वर्षीय अलाकुंता स्वामी आणि १९ वर्षीय उमाराणी हे दोघेही निकटचे नातेवाईक होते. हे दोघे सोमवारी रात्री भोंगिर येथील एका हॉटेलमध्ये गेले. तिथे त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. 

हॉटेल कर्मचाऱ्याला ते दोघेही बेशुद्धावस्थेत बेडवर पडल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आम्हाला याची माहिती दिली, असे भोंगिर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पी कासी रेड्डी यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'ला सांगितले.

कोरोनामुळे HSBC करणार ३५००० कर्मचाऱ्यांची कपात

ते पुढे म्हणाले, आम्ही दोघांना रुग्णालयात दाखल केले. पहिल्यांदा स्वामीला मृत घोषित करण्यात आले. परंतु, उमाराणी अत्यव्यस्थ होती. तिला लगेच हैदराबाद येथील गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिनेही अखेरचा श्वास घेतला. 

स्वामी आणि उमाराणी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच जातीचे असले तरी ते निकटचे नातेवाईक होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांकडून लग्नाला विरोध होता. 

१६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध यादगिरीगुट्ट मंदिरात दोघांनी विवाह केला. त्यानंतर मेधाचल जिल्ह्यातील घाटकेसर पोलिसांशी संपर्क केला आणि सुरक्षेची मागणी केली. दोघेही सज्ञान होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या आई-वडिलांना याची माहिती दिली. 

धक्कादायक! मुलाच्या हत्येनंतर आईनेच मृतदेह तुकडे-तुकडे करुन फेकला

या जोडप्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना कुटुंबाकडून त्यांचा विवाह स्वीकारला जाणार नाही अशी भीती होती. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.