पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीनं आंध्रप्रदेशमधल्या शेतकऱ्याची आत्महत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीनं आंध्रप्रदेशमधल्या शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आंध्रमधल्या चित्तूर जिह्यातल्या रहिवाशी असलेला हा ५० वर्षीय शेतकरी गेले काही दिवस कोरोनाच्या बातम्या वाचून चिंतेत होता. तो सतत मोबाइलवर कोरोनासंबधीत व्हिडिओदेखील पहायचा. 

चीनमध्ये कोरोनाने आतापर्यंत घेतला १,११० नागरिकांचा बळी

''गेल्या काही दिवसांपासून  वडिलांचं वागणं खूपच विचित्र होतं. युरीन इनफेक्शनमुळे त्यांना तिरुपती येथील रुईया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इनफेक्शनमुळे त्यांना सर्दी ताप होता. मात्र घरी परतल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना स्वत:जवळ फिरकूही दिलं नाही. कुटुंबीय जवळ आल्यास ते दगडफेक करायचे. आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं ते सतत बोलायचे', अशी माहिती त्यांच्या मुलानं दिली. 

पवईत पत्नीचा घरात संशयास्पद मृत्यू, पोलिसांचा नवऱ्यावर संशय

आंध्रप्रदेशमध्ये कोरोनाचा अद्याप एकही संशयीत आढळला नाही. मात्र सर्दीवरील औषधं घेऊनही ती बरी झाली नाही, त्यामुळे आपल्याला कोरोनाच झाला या भीतीनं  या शेतकऱ्यानं  टोकाचं पाऊल उचललं. ''सर्दी, तापाचा संसर्ग कुटुंबीयांना होऊ नये म्हणून मास्क लावण्यात डॉक्टरांकडून त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र या आजाराची  भीती त्यांच्या मनातून जात नव्हती. गावकऱ्यांनी देखील त्यांची समजूत काढली,  अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. कुटुंबातील इतर लोकांना कोरोना होईल या भीतीनं त्यांनी घरापासून दूर जात गळफास लावून आत्महत्या केली'' असंही त्यांच्या मुलानं सांगितलं.  मंगळवारी त्याचा मृतदेह कुटुंबीयांना आढळला.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर