पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाची दहशत, भारतासह जगातील एक तृतीयांश नागरिक घरात कैद

लॉकडाऊन

भारतातील कोट्यवधी नागरिक बुधवारपासून तीन आठवड्यांसाठी लॉकडाऊनमुळे घरातच राहणार आहेत. जगातील एक तृतीयांश लोक सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या घरात बंद आहेत. कोरोना विषाणूच्या थैमानामुळे जपानमध्ये होणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. भारतील १.३ बिलियन लोक सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या घरात बंद आहेत. लोकांना तीन आठवड्यांसाठी घरात राहण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशातील जनतेला तीन आठवड्यांसाठी आपल्या घरात बंद राहून कोरोना विषाणूला पराभूत करण्याचे आवाहन केले आहे. 

कोरोना : सांगलीकरांना मिळणार जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा

दुसरीकडे, अमेरिकेत कोरोना विषाणूच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत या साथीमुळे देशातील ७०६ जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या विज्ञान आणि आभियांत्रिकी केंद्राने (सीएसएसई) मंगळवारी याची माहिती दिली. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संक्रमणाचे ५३,७४० प्रकरणांना दुजोरा मिळाला आहे. न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यानंतर किंग्स कॉऊंटीमध्येही याचा प्रकोप दिसून आला आहे. 

जर्मनीत कोरोना विषाणूचे एकाच दिवशी ४७६४ नवीन प्रकरणे समोर आली. यामुळे या देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढून ३१,३७० झाली आहे. रॉबर्ट कोच संस्थेने (आरकेआय) ही माहिती दिल. जर्मनीत आतापर्यंत यामुळे १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

विदेशात न गेलेल्या तामिळनाडूतील व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू

फ्रान्समध्ये कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या वाढून ११०० जणांचा जीव गेला आहे. मागील २४ तासांत २४० जण दगावले आहेत. फ्रान्समध्ये या विषाणूमुळे संक्रमित रुग्णांची संख्या २२३०० इतकी झाली आहे. 

कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीमध्ये मृतांचा आकडा ६८२० इतका झाला आहे. मागली २४ तासांत तिथे ७४३ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी कोरोना संक्रमित नवीन ५२४९ प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे एकूण रुग्ण ६९१७६ पर्यंत गेले आहेत. विशेष म्हणजे इटलीमध्ये ८३२६ लोक यातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

जगात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची सर्वाधिक संख्या युरोपात - WHO