पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दलित तरुणाशी लग्नामुळे वडील मारण्याच्या तयारीत, भाजप आमदाराच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल

साक्षी मिश्रा आणि अजितेश कुमार

एका दलित व्यक्तीशी लग्न केल्यामुळे माझे वडील मला मारण्याची शक्यता आहे. त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. यासाठी आम्हाला पोलिस संरक्षण दिले जावे, अशी मागणी उत्तर प्रदेशमधील भाजप आमदाराच्या मुलीने केली आहे. या मागणीचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

साक्षी मिश्रा (वय २३) या उत्तर प्रदेशमधील बरैली जिल्ह्यातील बिठारी चैनपूर मतदारसंघातील भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी आहेत. अजितेश कुमार यांच्याशी लग्न केल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले.

VIDEO : तीन वर्षांचा मुलगा मुंबईत नाल्यात पडला, शोध सुरू

आपल्याच वडिलांना व्हिडिओच्या माध्यमातून केलेल्या एका आवाहनात साक्षी मिश्रा यांनी म्हटले आहे की अजितेश कुमार आणि त्यांच्या कुटुंबियांपासून लांब राहावे. त्यांना कोणताही त्रास देऊ नये. मी माझ्या मर्जीने लग्न केले आहे. पण माझ्या वडिलांना ते पसंद नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला मारण्यासाठी गुंड पाठवले आहेत. गुंडापासून वाचण्यासाठी आम्ही सतत इकडे तिकडे धावपळ करीत आहोत. पण आम्हाला आता याचा कंटाळा आला आहे. आम्हाला आता पोलिस संरक्षण दिले जावे.

जर आम्ही या गुंडांच्या ताब्यात सापडलो, तर ते नक्कीच आम्हाला जीवे मारतील, असेही साक्षी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये अजितेश कुमारही बोलताना दिसतो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो. तिथे काही गुंड आले होते. आम्ही अगदी थोडक्याच बचावलो, असे त्याने म्हटले आहे.

BLOG : किवींनी भारताच्या 'कोहिनूर हिऱ्यांचा' जीव काढला!

दरम्यान, या व्हिडिओबद्दल भाजपने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलिस उपमहानिरीक्षक आर के पांडे म्हणाले, मी हा व्हिडिओ बघितला आहे आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना संबंधित दाम्पत्याला पुरेशी सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले आहेत.