पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामा हल्ल्याप्रकरणी बापलेकीला अटक, आत्मघातकी हल्लेखोराला आसरा दिल्याचा आरोप

पुलवामा हल्ल्यावेळचे दृश्य (PTI)

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुलवामा येथे राहणाऱ्या एका वडील आणि मुलीला अटक केली आहे. दोघांनी गेल्यावर्षी १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद दार, शाकिर बशीर मागरे आणि जैश-ए-मोहम्मदच्या कंमाडर्सला आसरा दिल्याचा आरोप आहे. 

गेल्या आठवड्यात शाकिर बशीर मागरेला आदिल अहमदची मदत केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, हल्ल्याच्या दिवशी मागरेने आदिल अहमदची कार चालवली होती. परंतु, घटनास्थळाच्या ५०० मीटर आधी तो उतरला होता. यावरुन हल्ल्यात त्याचाही किती सहभाग होता हे लक्षात येते.

पुलवामा हल्लाः NIAला मोठे यश, सुसाइड बॉम्बरला मदत करणाऱ्याला अटक

मागील वर्षी १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे २५०० सीआरपीएफ जवानांना ७८ बसमधून नेण्यात येत होते. तेव्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला समोरुन येत असलेल्या एका कराने धडक दिली होती. त्यावेळी स्फोट झाला होता. हा हल्ला आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद दारने केला होता. 

देव सर्वांचा आहे, देव दर्शनात राजकारण नको: मुख्यमंत्री

घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. पाकिस्तान येथील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. भारताने पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवसांनी दहशतवाद्यांवर हल्ला केला होता. 

दि. २६ फेब्रुवारीला भारतीय हवाईदलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर एअरस्ट्राइक केला होता. या एअरस्ट्राइकमध्ये सुमारे ३०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.

'मोदी भक्तांनी सुद्धा सोशल मीडिया सोडला तर देश शांत होईल'