पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकचा तो डाव फसणार अन् डोकेदुखी कायम राहणार

इम्रान खान

दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानला मोठी चपराक बसली आहे. दहशतवाद्यांना पुरविण्यात येणारी आर्थिक रसद नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्यामुळे  फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) 'ग्रे लिस्ट'मध्ये कायम ठेवण्याची शिफारस केली आहे. शुक्रवारी यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय एफएटीएफच्या इंटरनॅशनल को-ऑपरेशन रिव्यू ग्रुप (आयसीआरजी) च्या बैठकीत घेण्यात आला. शुक्रवारी यावर अधिकृत मोहर लागेल.  

'२६/११ चा हल्ला हा 'हिंदू दहशतवादी' दाखवण्याचा कट शिजला होता'

दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवठा करणाऱ्या दोषींविरोधात कठोर कायद्याची अंमलबजावणी करावी, असेही फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला सुनावले आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम करणाऱ्या फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सची (एफएटीएफ) १६ फेब्रुवारीपासून पॅरिसमध्ये सुरु असलेली बैठक २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अखेरच्या दिवशी पाकिस्तानला एफएटीएफटचा दणका बसेल.  

राज्यात NRC लागू होऊन देणार नाही: मुख्यमंत्री

दहशतवाद्यांना पुरवण्यात येणाऱ्या अर्थिक मदतीला आळा घालण्यासाठी २७ सूत्री कार्यक्रमाची पाकिस्तानने कशा पद्धतीने अंमलबजावणी केली, यासंदर्भात बैठकीत समीक्षा केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या कोर्टाने मुंबई हल्ल्यातील सूत्रधार हाफिज सईदला दहशतवादासंदर्भातील दोन प्रकरणात ११ वर्षांची शिक्षा सुनावली होती. पाकचा हा निर्णय एफएटीएफ आणि पश्चिमी राष्ट्रांना खुश करण्यासाठी घेण्यात आला होता. ग्रे सूचीतून बाहेर पडण्यासाठी  पाकने हा डाव खेळल्याचीही चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगली होती. मात्र त्याचा पाकिस्तानला अपेक्षित असा फायदा होणार नाही, असेच दिसत आहे.