पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० विरोधात आंदोलन; फारुख अब्दुल्लांच्या बहीण आणि मुलीला अटक

कलम ३७० विरोधात आंदोलन; फारुख अब्दुल्लांच्या बहीण आणि मुलीला अटक

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्यात आले होते. त्यानंतर अजूनही याचा विरोध सुरु आहे. श्रीनगरमध्ये मंगळवारी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची बहीण सुरय्या आणि मुलगी साफिया हे कलम ३७० काढल्याचा विरोध करत होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासमोर अर्धा डझन महिला आंदोलकांनाही अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री झोपेत सुद्धा माझे नाव घेत असतील : शरद पवार

फारुख अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या महबुबा मुफ्ती अजूनही नजरकैदेत आहेत. काही दिवसांपूर्वीच फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यंची नॅशनल कॉन्फरन्सच्या १५ सदस्यीय शिष्टमंडळाने भेट घेतली होती.

शेंबडं पोरंही सांगेल राज्यात महायुतीचंच सरकार येणारः फडणवीस

हाताला काळी पट्टी बांधून आणि फलक घेऊन आंदोलन करत असलेल्या महिला आंदोलकांना परवानगी देण्यात आली नव्हती. त्यांना शांतता राखण्यास सांगण्यात आले होते. परंतु, आक्रमक असलेल्या महिला आंदोलकांनी हे मान्य केले नाही. सर्वांनी एकत्रित येत ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सीआरपीएफच्या एका पथकाने आंदोलनकर्त्या महिलांना पकडून पोलिस वाहनात बसवले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Farooq Abdullahs sister Suraiya and daughter Safiya detained during a protest against abrogation of Article 370