पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फारुख अब्दुल्लांच्या नजरकैदेत आणखी ३ महिन्यांची वाढ

फारुख अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुला यांची नजरकैद आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. ते ५ ऑगस्टपासून नजरकैदेत आहेत. त्याच दिवशी जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवण्यात आला होता. 

या कालावधीत ते आपल्याच घरी राहतील. त्याला उपकारागृह जाहीर करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० शी निगडीत विशेष राज्याचा दर्जा देणारी कलमे हटवण्यात आली होती. त्याचबरोबर दोन केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये विभाजन करण्यात आले होते.

फारुख अब्दुल्ला यांना अवैधरित्या नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप करणारी याचिका एमडीएमकेचे नेते वायको यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर काही तासांतच फारुख यांच्यावर १७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत (पीएसए) कलमे लावण्यात आली होती.

सावरकर देशाचे दैवत, अपमान सहन करणार नाही; सेनेने काँग्रेसला सुनावलं

या कलमांनुसार कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही सुनावणीनुसार तीन ते सहा महिने कारागृहात ठेवता येते.