पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तब्बल सात महिन्यानंतर फारुख अब्दुल्ला मुक्त होणार, नजरकैद संपुष्टात

फारुख अब्दुल्ला

अखेर सात महिन्यांनंतर जम्मू-काश्मीर सरकारने नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची नजरकैद संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फारुख अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीर सार्वजनिक सुरक्षितता कायदा १९७८ नुसार नजरकैद करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरचे प्रमुख योजना सचिव रोहित कन्साल यांनी आपल्या टि्वटर हँडलवरुन फारुख अब्दुल्ला यांची नजरकैद संपुष्टात आल्याच्या आदेशाची प्रत शेअर केली आहे. 

'ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प एकांगी आणि जनतेची दिशाभूल करणारा'

फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात मागील वर्षा १५ सप्टेंबरला पीएसए लावण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांची नजरकैद ११ मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती. सरकारने आज (शुक्रवार) अब्दुल्ला यांची नजरकैद संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे दोन्ही माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती अजूनही नजरकैदेत असतील.  

राज्यात कोरोनाच्या १४ रुग्णांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक: आरोग्यमंत्री

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, सीपीएम नेते सीताराम येचुरी यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून जम्मू-काश्मीरच्या तीनही माजी मुख्यमंत्र्यांना मुक्त करण्याची विनंती केली होती.

फारुख अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर ५ ऑगस्ट २०१९ रोजी नजरकैद केले होते. परंतु, सरकारने त्यांच्याविरोधात मागील १५ सप्टेंबरला पीएसए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तीन महिन्यासाठी त्यांना नजरकैद करण्यात आले होते. ती मुदत १५ डिसेंबरला संपुष्टात येणार होती. त्याच्या दोन दिवसाआधी १३ डिसेंबरला पुन्हा तीन महिन्याचा कालावधी वाढवण्यात आला होता.