पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माकडांना घाबरवण्यासाठी गावातले श्वान झाले वाघ

गावातले श्वान झाले वाघ

माकडांच्या उच्छादामुळे  कर्नाटकातील नारूलू गावातील शेतकरी हैराण आहेत.  माकडांकडून कॉफी आणि  सुपारीचं मोठं नुकसान केलं जात आहे. पिकांची नासाडी रोखण्यासाठी आणि माकडांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी इथल्या गावकऱ्यांनी  भन्नाट शक्कल  शोधली आहे. 

औरंगाबाद शहरात बिबट्या, जेरबंद करण्यासाठी वनविभाग घटनास्थळी

गावातील एका शेतकऱ्यांनं आपल्या श्वानास वाघासारखं रंगवलं. 'यापूर्वी आम्ही शेतात हुबेहूब वाघासारखं दिसणारं खेळणं ठेवलं होतं. मात्र ही शक्कल फारशी कामी आली नाही. कारण खेळण्याचा रंग काही दिवसांनी उडून गेला. मग मी माझ्या पाळीव श्वान बुलबूलवर हेअर डायनं वाघासारखे  काळे पट्टे ओढले. बुलबूल दिवसातून दोनदा  शेतावर जातो. तो वाघ असल्याचं वाटून माकडांनी आता शेतावर येण्याचं थांबवल्याचं',  शेतकरी श्रीकांत गोवडा एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले.

श्रीकांत यांची ही शक्कल गावातील इतर शेतकऱ्यांनाही आवडली. त्यांनीही माकडांना दूर ठेवण्यासाठी हिच शक्कल वापरायला सुरुवात केली असं श्रीकांत याची मुलगी म्हणाली. 

संगमनेरमध्ये ट्रक चालकाकडून टोल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला