पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हरयाणामध्ये स्वतःवर गोळी झाडून पोलिस उपायुक्तांची आत्महत्या

पोलिस उपायुक्त विक्रम कपूर

हरयाणातल्या फरिदाबादमध्ये पोलिस उपायुक्तांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिस उपायुक्त विक्रम कपूर यांनी आज सकाळी बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच फरिदाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कलम ३७०: पाकिस्तानने युएनएससीकडे बैठकीची केली मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम कपूर यांनी आज सकाळी ६ वाजता आत्महत्या केली. फरिदाबाद येथील सेक्टर ३० मधील पोलिस वसाहतीत असणाऱ्या घरामध्ये विक्रम कपूर यांनी आत्महत्या केली. स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून त्यांनी आत्महत्या केली. घटनास्थळावर पोलिसांना सुसाइड नोट सापडली नाही. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांचा तपास सुरु असून ते आसपासच्या लोकांची चौकशी करत आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. विक्रम कपूर २०२० मध्ये निवृत्त होणार होते. 

हडपसरमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू