पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरूण जेटलींच्या पत्नीने उपराष्ट्रपती, पंतप्रधानांना लिहिले पत्र, कारण की...

अरूण जेटली

माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला मिळणारे निवृत्तीवेतन राज्यसभेतील एखाद्या गरजू कर्मचाऱ्यासाठी देण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. अरूण जेटली यांच्या पत्नी संगीता यांनी यासाठी राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. 

नवी मुंबईत शिवसेनेला धक्का; 200 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

आपल्या पत्रामध्ये संगीता यांनी लिहिले आहे की, जवळपास दोन दशके अरूण जेटली यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून काम बघितले. त्यांची पत्नी म्हणून मला मिळणारे निवृत्तीवेतन याच संस्थेतील गरजू कर्मचाऱ्यांसाठी देण्याची माझी इच्छा आहे. मला ही खात्री आहे की अरूण जेटली आज हयात असते, तर त्यांनीही त्यांचे निवृत्तीवेतन निश्चितपणे याच संस्थेतील गरजू कर्मचाऱ्यांना दिले असते. 

पालघरमध्ये 13 कोटींचा शस्त्रसाठा आणि अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

याच पत्राची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठविण्यात आली आहे. २४ ऑगस्ट रोजी अरूण जेटली यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले होते. ते ६६ वर्षांचे होते. अरूण जेटली यांनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. त्याचबरोबर त्यांनी राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणूनही काम सांभाळले होते.