पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उन्नाव प्रकरण : पीडितेला हलविण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून लांबणीवर

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेवर उपचार सुरू आहेत

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला दिल्लीला हलविण्यासंदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत लांबणीवर टाकला. गेल्या रविवारी या तरुणीचा रायबरेलीला येत असताना अपघात झाला होता. या अपघातात ती आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले आहेत. तर पीडितेचे दोन नातेवाईक अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. या प्रकरणी गुरुवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 

शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले आहे की, पीडिता आणि तिचे वकील या दोघांना पुढील उपचारांसाठी दिल्लीला हलविण्यासंदर्भात कुटुंबीय फारसे सकारात्मक नाहीत. त्यामुळे न्यायालय या संदर्भातील निर्णय सोमवारपर्यंत लांबणीवर टाकत आहे. 

EVM वर आंदोलनाऐवजी विरोधक जनतेत गेले तर सहानुभूती मिळेल - फडणवीस

पीडितेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, पीडिता सध्या बेशुद्ध असल्यामुळे तिला सध्या त्याच रुग्णालयात ठेवले जावे. त्याचवेळी पीडित तरुणीला लखनऊच्या बाहेर घेऊन जाण्याआधी आपली परवानगी घेतली जावी, अशीही आईची मागणी असल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले. लखनऊमधील पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रोज तिच्या प्रगतीबद्दल मला माहिती द्यावी, अशीही मागणी आईने केल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले.

दरम्यान, हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेले पीडितेच्या काकांना रायबरेली कारागृहातून तिहार तुरुंगात हलविण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

काश्मीरवर तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज नाही, भारताची स्पष्टोक्ती

भाजपने हकालपट्टी केलेले आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर या पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यांनीच रविवारी पीडितेच्या गाडीला अपघात घडवून आणल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. कुलदीप सेंगर यांचा भाऊ मनोज सिंह यांच्याकडून पीडित तरुणीला धमक्या येत होत्या. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी १२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून सुरक्षा पुरविण्याची मागणी केली होती. त्यातच पीडितेच्या गाडीला गेल्या रविवारी अपघात झाला. या अपघातानंतर सर्वोच्च न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबियांनी पाठविलेल्या पत्राची गंभीर दखल घेऊन या प्रकऱणी स्वतःहून सुनावणी घेतली.