पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अशीही मदत..., वडिलांच्या तेराव्याऐवजी गरिबांना केले अन्नदान

उमाशंकर प्रजापती यांचे वडील दीनानाथ प्रजापती यांचे १७ मार्चला निधन झाले.

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण जगापुढे सध्या अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. जगातील अनेक देशांतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. भारतात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे काही व्यक्तींना आपल्या घरातील मृत व्यक्तीचे अत्यंकर्म करणेही अशक्य झाले आहे. अशातच मिर्झापूर येथील उमाशंकर प्रजापती यांनी एक सकारात्मक पाऊल उचलले. आपल्या वडिलांच्या तेराव्यानिमित्त नातेवाईकांना जेवण देण्यापेक्षा त्यांनी गावातील गरिबांना, मजुरांना जेवणाचे पॅकेट वाटले. पोलिसांच्या मदतीने त्यांनी हा उपक्रम केला.

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढणार का ? कॅबिनेट सचिव म्हणाले...

लॉकडाऊनमध्ये सध्या सर्वाधिक हाल गरिबांचे होताहेत. रस्त्यावर राहणारे, रोजंदारी करणारे मजूर यांच्याकडे खाण्यापिण्याची काहीच साधने नाही. त्यामुळे त्यांना जेवणाचे पॅकेट देण्याचा निर्णय उमाशंकर प्रजापती यांनी घेतला. या पॅकेटमध्ये पुरी-भाजी आणि लाडू असे पदार्थ होते. यासोबतच या लोकांना तोंडाला बांधण्यासाठी मास्क आणि हँड सॅनिटायझरही देण्यात आले. 

मुंबईतील चाळीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

उमाशंकर प्रजापती यांचे वडील दीनानाथ प्रजापती यांचे १७ मार्चला निधन झाले. दीनानाथ प्रजापती यांनी अनेक सामाजिक कामांमध्ये पुढाकार घेतला होता. त्यामुळेच उमाशंकर प्रजापती यांनी तेराव्याला गरिबांना जेवण देण्याचा निर्णय घेतला. मिर्झापूरमधील गरिब वस्त्यांमध्ये जाऊन तेथे लोकांना जेवणाचे पॅकेट वाटण्यात आले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:family decided father tervi sanskar donate money and food on poor people lockdown coronavirus in mirzapur