पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामा : शहिदांच्या कुटुंबीयांची उपेक्षा, आश्वासनांची पूर्तता नाहीच

संग्रहित छायाचित्र

 पुलवामा दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष लोटलं. या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्यानं अवघा देश हादरला, मात्र वर्ष उलटूनही काही शहिदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी अक्षरश: हेलपाटे घालावे लागत आहेत. शहिदांच्या कुटुंबीयांना  अनेक आश्वासनं देण्यात आली होती, मात्र त्यांची पूर्तता अद्यापही झाली नाही. 

'देश के गद्दारों को...' यासारख्या विधानांनी घात केला- अमित शहा

उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या  २४ वर्षीय संजू देवींचे पती महेश कुमार या हल्ल्यात शहीद झाले. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घरी येऊन अनेक आश्वासानं दिली, असं संजू  देवी म्हणाल्या. महेश कुमार यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला जाईल असं  आश्वासन संजू देवींना देण्यात आलं होतं मात्र अद्यापही मुलांच्या शिक्षणासाठी खर्च मिळाला नाही असं संजू देवी म्हणाल्या. शिकवणी करून घरचा खर्च भगवावा लागत असल्याचं त्या म्हणाला. तसेच घरासमोर पक्का रस्ता,  शहीद पतीचे स्मारक आणि  उद्यान बांधून देण्याचं आश्वासनही राजकीय पक्षांनी दिलं होतं, मात्र त्याही आश्वासानांचा विसर पडल्याची खंत त्यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलनाता व्यक्त केली. 

नेहरु-पटेल कॅबिनेटवरुन परराष्ट्र मंत्री जयशंकर-रामचंद्र गुहा आमनेसामने

आग्राच्या शहीद कौशल कुमार रावत यांच्या कुटुंबीयांमध्येही सरकारी यंत्रणांविषयी नाराजी आहे. राज्य सरकारनं त्यांना २५ लाखांची मदत, कुटुंबीयातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र कौशल यांच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही. कौशल यांच्या स्मारकाचाही अपमान झाला असल्याची नाराजी त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. स्मारकाजवळ शहीद कौशल कुमार रावत यांच्या नावातही चूक असून त्यांचं नाव अत्यंत लहान अक्षरात लिहिण्यात आलं हे तर गावच्या सरपंचांचं आणि इतर राजकीय नेत्यांची नावं मोठ्या अक्षरात आहेत. स्थानिक नेत्यांनी स्मारकावर माझ्या शहीद नवऱ्याचं नाव अत्यंत लहान अक्षरात लिहून त्यांच्या अपमान केला आहे, अशी नाराजी ममता राव यांनी व्यक्त केली आहे. 

मनीषा म्हैसकर यांच्यासह राज्यातील या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

बिहारच्या शहीद रतन कुमार ठाकूर  यांच्या कुटुंबीयांना  आर्थिक मदत मिळाली आहे, मात्र त्यांच्या कुटुंबीयांना घर देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता वर्ष उलटलं तरी झालेली नाही. राजस्थानमधील भरतपूर येथील शहीद सीआरपीएफ जवान जीताराम यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीचं आश्वासन देण्यात आलं होतं. गुजर यांच्या कुटुंबीयांना २५ लाखंची आर्थिक मदत मिळाली आहे मात्र नोकरीच्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. गावातल्या शाळेस शहीद गुजर यांचे नाव देण्याचं आश्वासन स्थानिक नेत्यांनी दिले होते त्या  आश्वासनाची देखील पूर्तता व्हायची आहे, असं त्यांचे वडील राधे श्याम म्हणाले.