पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींचा पुन्हा ममतांना धक्का, हिंसाचारातील मृतांच्या नातेवाईकांना शपथविधीचे निमंत्रण

नरेंद्र मोदी

पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या राजकीय हिंसाचारात मृत पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी आणखी एक धक्का असल्याचे मानले जात आहे.

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला ममता बॅनर्जी जाणार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्याचबरोबर त्याआधी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राज्यात विविध ठिकाणी हिंसाचार झाला होता. या हिंसाचारत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या नातेवाईकांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. 

माझ्या वडिलांची तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हत्या केली. आम्हाला उद्याच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. आता आमच्या भागात शांतता आहे, असे मनू हन्सदा यांच्या मुलाने एएनआयला सांगितले.

नियोजित मंत्र्यांना नरेंद्र मोदी स्वतः आज संध्याकाळपासून फोन करणार - सूत्र

दरम्यान, शपथविधी सोहळ्यासाठी ममता बॅनर्जी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यांनी स्वतः मंगळवारी माध्यमांना ही माहिती दिली. गुरुवारी संध्याकाळी सात ते साडेआठ या वेळेत राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी १८ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. त्याचवेळी तृणमूल काँग्रेसच्या जागा २२ पर्यंत कमी झाल्या होत्या.