पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हॉटसऍप हॅक झाल्याचे उघडकीस आल्यावर आता कंपनी म्हणते...

व्हॉट्सऍप

ग्राहकांच्या खासगी माहितीची सुरक्षितता यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे व्हॉटसऍपने मंगळवारी स्पष्ट केले. ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेचा विचार करूनच आम्ही मे महिन्यांमध्ये व्हॉटसऍपवरील सायबर हल्ला रोखला होता आणि संबंधित कंपनीला जबाबदार धरले होते, असे कंपनीने स्पष्ट केले.

महाराष्ट्राला लागलेले ग्रहण लवकरच सुटणार, संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

ग्राहकांच्या खासगी माहितीच्या सुरक्षिततेसाठी व्हॉटसऍपने एंड टू एंड एन्क्रिप्शन दिले आहे. एंड टू एंड एन्क्रिप्शन हे या क्षेत्रातील सुरक्षिततेसाठी सर्वोच्च समजले जाते, याकडेही व्हॉटसऍपने लक्ष वेधले आहे. 

व्हॉटसऍपच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलमध्ये मालवेअर पाठविण्याचा सायबर हल्ला गेल्या मेमध्ये आखण्यात आला होता. पण व्हॉटसऍपच्या तांत्रिक टीमने तो उधळून लावला. एंड टू एंड एन्क्रिप्शन भेदण्यात ते अपयशी ठरले होते. या स्वरुपाच्या मालवेअरच्या माध्यमातून मोबाईलमधील माहिती चोरण्याची सर्वाधिक शक्यता असते.

मणिपूरमध्ये आयईडीचा स्फोट; ४ पोलिस गंभीर जखमी

व्हॉटसऍप हॅकिंगची झळ भारतातील १४०० जणांना बसली आहे. यामध्ये राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे. व्हॉटसऍपच्या माध्यमातून खासगी माहितीची चोरी झाल्याचे उघडकीस आल्यावर केंद्र सरकारने या संदर्भात व्हॉटसऍपकडून खुलासा मागविला आहे. हा अत्यंत गंभीर मुद्दा असून, सरकार याबाबत चिंतित असल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.