पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फेशियल रेकग्निशन, ड्रोन्स, सीसीटीव्ही आणि हजारो पोलिस; संचलनासाठी दिल्लीत कडेकोट सुरक्षा

संचलनाची रंगीत तालीम

उद्या रविवारी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनानिमित्त राजधानी नवी दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे, फेशियल रेकग्निशन सिस्टिम (चेहऱ्यावरून ओळख) आणि हजारो सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी यावेळी ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलसोनारो प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत.

कोणाला तरी वाचविण्यासाठी भीमा-कोरेगावचा तपास NIA कडे - अनिल देशमुख

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे आठ किलोमीटर लांब संचलन मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी जवळपासच्या उंच इमारतींवर शार्पशूटर्सही नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणतीही व्यक्ती काहीतरी संशयास्पद हालचाल करीत असल्याचे दिसल्यावर तिला टिपणे शक्य होईल.

संशयितांची ओळख पटविण्यासाठी राजपथावर येणाऱ्या मार्गांवर फेशियल रेकग्निशन सिस्टिम बसविण्यात येईल. त्यामुळे कोणताही संशयित गुन्हेगार या ठिकाणी येऊ शकणार नाही. त्याला आधीच रोखण्यात येईल. संचलनाच्या मार्गावर हजारो सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यापैकी सुमारे १५० कॅमेरे लाल किल्ला, चांदणी चौक आणि यमुना खादर भागात बसविण्यात आले आहेत. 

... हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे लक्षण, शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

नवी दिल्ली क्षेत्राचे पोलिस उपायुक्त इश सिंघल यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, संचलन मार्गाजवळ चार स्तरिय सुरक्षाव्यवस्था तैनात असणार आहे. त्यासाठी पाच ते सहा हजार पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. निमलष्करी दलाच्या ५० तुकड्याही या ठिकाणी तैनात असणार आहेत. सर्व सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Facial recognition system drones CCTV cameras Security stepped up ahead of Republic Day 2020