पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत आणि चीन सैन्य पुन्हा आमने-सामने

भारत-चीन सीमा

भारत आणि चीनमध्ये पुन्हा एखदा सीमावाद झाल्याची घटना समोर आली आहे. लडाखमध्ये चीन आणि भारतीय सैनिक आमने-सामने आले. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी लडाखमधील पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रकार घडला. दोन्ही सैनिकांमध्ये धक्काबुकी झाली आसल्याची माहिती देखील समोर येत आहे.

PHOTOS : मुंबईत विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर भारतीय आणि चीनी सैन्य आमने-सामने आले. भारतीय सैन्य गस्तीवर असताना हा प्रकार घडला. भारताने लडाखला केंद्र शासित प्रदेश बनवले आहे. भारताच्या या निर्णयाला चीनने विरोध केला आहे. त्यामुळे चीन आणि भारतात सध्या तणावाचे वातावरण आहे. दरम्यान दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर परिस्थिती सामान्य झाली.

उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल

पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर यापूर्वी सुध्दा दोन्ही सैन्यांमध्ये वाद झाले होते. २०१७ मध्ये दोन्ही देशाचे सैन्य आमने-सामने आले होते. ऐवढेच नाही तर डोकलाम येथे देखील दोन्ही सैन्यामध्ये वाद झाला होता. हा वाद खूप दिवस सुरु होता. सुमारे ७० दिवस दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांसमोर उभे होते. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर दोन्ही देशाच्या सैनिकांनी माघार घेतली.

हे आहेत पुण्यातील पाच मानाचे गणपती