उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवेला 'ब्रेक'
दिल्लीतील थंडीने जवळपास मागील १२० वर्षांपासूनचा विक्रम मोडीत काढला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अनेक भागात तापमानाचा पारा २ अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेला आहे. गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीतील तापमान १० अंश सेल्सियसच्या खाली आहे. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासह उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड, लडाख, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे.
राजस्थानमधील पाच शहरांमध्ये पारा पाच अंश सेल्सियसच्या खाली घसरला आहे.
'प्रियांका गांधींसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा'
दिल्लीतील थंडीचा विमान आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत असून हावडा एक्सप्रेस, नवी दिल्ली पूर्वी एक्सप्रेससह २४ रेल्वे गाड्या पाच तास उशिराने धावत आहेत. स्कायमेटच्या अंदाजानुसार, ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतातील डोंगराळ भागांमध्ये ३ जानेवारीला बर्फवृष्टी होण्याची शक्यता असून थंडी अधिक वाढण्याचे संकेत आहेत.
India Meteorological Department (IMD): However temperatures have fallen by 1-2 °C at few places over West Rajasthan & West Madhya Pradesh during past 24 hours observed at 0530 hours IST today. No significant change in temperatures over remaining parts of northwest India. https://t.co/aQQYU4oeJO
— ANI (@ANI) December 29, 2019