पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश

एस जयशंकर

देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी औपचारिकपणे सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत संसद भवनामध्ये हा प्रवेश झाला.

३० मे रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीवेळी जयशंकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रिपदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. सुषमा स्वराज नव्या मंत्रिमंडळात नसणार हे स्पष्ट झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी या पदासाठी जयशंकर यांची निवड केली होती. जयशंकर हे नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी मानले जातात.

'विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिशांच्या ठेवणीला राष्ट्रीय दर्जा द्या'

भारताचे आंतरराष्ट्रीय विषयातील तज्ज्ञ के सुब्रमण्यम यांचे जयशंकर हे पुत्र आहेत. गेल्या मोदी सरकारमध्ये भारताची परराष्ट्र निती आखण्यामध्ये एस जयशंकर यांचाही मोठा वाटा होता. त्यावेळी ते परराष्ट्र खात्याचे सचिव होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि जयशंकर यांची गेल्या सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका होती.
परराष्ट्र धोरणासंदर्भात धाडसाने निर्णय घेण्याची हातोटी जयशंकर यांच्याकडे आहे, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.    

१९७७ च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी राहिलेले जयशंकर यांनी अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे.