पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले राजकारणात येण्याचे कारण

एस जयशंकर

माजी परराष्ट्र सचिव आणि विद्यमान परराष्ट्र मंत्री असलेले एस जयशंकर यांनी राजकारणात येण्याचे कारण सांगितले आहे. मी या सरकारला सुधारणांवर काम करताना पाहिले. पहिल्यांदाच आपल्याकडे असे सरकार आहे, ज्यांच्यासाठी सुधारणा याचा अर्थ पोषण, मुलींचे शिक्षण, मध्यमवर्गीय लोकांची सेवा असा आहे. तेव्हा मला या सुधारणेत माझेही योगदान असावे असे वाटले आणि राजकारणात प्रवेश केला, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. 

परराष्ट्र सचिवपदावरुन निवृत्त झाल्यानंतर जयशंकर यांनी टाटा समूहाच्या ग्लोबल कॉर्पोरेट प्रकरणांचे अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला होता. जयशंकर यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

एस जयशंकर हे अनुभवी हे राजनैतिक अधिकारी आहेत. चीन आणि अमेरिकेबरोबरील चर्चेवेळी ते भारताचे प्रतिनिधीही होते. देशातील प्रमुख सामरिक तज्ज्ञांपैकी एक दिवंगत के सुब्रमण्यम यांचे सुपुत्र जयशंकर ऐतिहासिक भारत-अमेरिकेतील अणू करारावेळी चर्चा करणारे भारतीय पथकातील एक प्रमुख सदस्य होते. या कराराची सुरुवात २००५ मध्ये झाली होती आणि २००७ मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने यावर हस्ताक्षर केले होते. जानेवारी २०१५ मध्ये जयशकंर यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी सुजाता सिंह यांना हटवून जयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयावर त्यावेळी टीका करण्यात आली होती.

जयशंकर यांनी अमेरिका आणि चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केले आहे. १९७७ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी जयशंकर यांनी लडाखमधील देपसांग आणि डोकलाम वादावेळी चीनबरोबरील संबंध निवळण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. ६४ वर्षीय जयशंकर जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१८ पर्यंत विदेश सचिव होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:External Affairs Minister Dr S Jaishankar said A reason I joined politics is that I saw a govt talking about reforms