पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंजाब: मिरवणुकी दरम्यान फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

मिरवणुकी दरम्यान स्फोट

पंजाबमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान फटाक्यांचा स्फोट झाला. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे तर ११ पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत. पंजाबच्या तरन-तारन जिल्ह्यामध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हर्षवर्धन जाधव यांची घरवापसी; राज ठाकरेंच्या उपस्थितीत 'मनसे'प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरन-तारन जिल्ह्यामध्ये धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक पुहाविंद गावातील बाब दीप सिंह गुरुद्वारपासून ते भिखीविंद तालुक्यातील चब्बा गावातील तहला साहिब गुरुद्वारापर्यंत काढण्यात आली होती. या मिरवणुकी दरम्यान फटाक्यांचा स्फोट झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अमृतसर मार्गावर घडली. 

चितळे उद्योग समुहाचे संचालक काकासाहेब चितळे यांचे निधन

या मिरवणुकीत अनेक जण फटाके फोडत होते. मिरवणुकीतील एका ट्रॅक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके ठेवण्यात आले होते. फटाक्यांची ठिणगी उडाल्यामुळे ट्रॅक्टरमधील फटाक्यांचा स्फोट झाला. त्यानंतर ट्रॅक्टरला आग लागली. या घटनेमध्ये मिरवणुकीत सहभागी झालेल्या २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अमृतसर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

पंजाबमध्ये तीन मजली इमारत कोसळली; अनेक जण अडकल्याची भीती