पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बेघर, गरिबांच्या आरोग्यावर प्रदूषणाचा सर्वात मोठा परिणाम होण्याची भीती

( छाया सौजन्य : biplov dev/ hindustan times)

गेल्या आठवड्याभरापासून धोक्याची पातळी ओलांडलेलं दिल्लीतील प्रदूषण हे चिंतेचा विषय ठरलं आहे. येथे आरोग्य आणिबाणी घोषित झाली आहे. धुरक्यामुळे अनेकांना श्वास घ्यायलाही  त्रास होत आहे. इथल्या प्रदूषित हवेत दिल्लीकरांचा जीव गुदमरतोय. मात्र याचा सर्वाधिक फटका बेघर,  रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या गरिबांच्या आरोग्याला बसणार आहे अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे.

बाळासाहेब हयात असते तर भाजपनं एवढं धाडस केलं असतं का?: रोहित पवार

२०१६ नंतर मोठ्या प्रमाणात वाईट परिस्थितीस दिल्लीकरांना सामोरं  जावं लागत आहे.   इथल्या प्रदूषणाचा त्रास हा बेघर आणि रस्त्यानजीक राहणाऱ्या गरीबांना अधिक होत आहे. दुर्दैव म्हणजे प्रदूषणापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करावा याबद्दल कोणतीही जागृती इथल्या लोकांमध्ये झालेली नाही. 

(छाया सौजन्य : biplov dev/ hindustan times)

इथल्या झोपडीत राहणाऱ्या ३५ वर्षीय सारिका यांच्या ६ वर्षांच्या लहान मुलाला प्रदूषणामुळे खोकल्याचा त्रास उद्धभवला आहे. प्रदूषणापासून वाचण्यासाठी मास्क लावतात हे आपल्याला माहितीच नसल्याचं  त्यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'शी बोलताना सांगितलं.

मंत्रालयाबाहेर शेतकरी संघटनेचे आंदोलन; राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात

मुख्य रस्त्यांच्या नजीक राहणाऱ्या बेघर आणि झोपडपट्टीमधील लोकांच्या आरोग्यावर प्रदूषणाचा मोठा परिणाम होत आहे. कारण रस्त्यालगत अधिक प्रदूषकं आहेत ती श्वासावाटे त्यांच्या शरीरात जात आहेत अशी चिंता डॉक्टर जुगल किशोर यांनी व्यक्त केली. 

(छाया सौजन्य : biplov dev/ hindustan times)

इथलं प्रदूषण बेघरांसाठी अधिक वाईट आहे, त्यांनी वाहतूक कोंडी ज्या परिसरात नसेल अशा ठिकाणी काही दिवसांसाठी राहावं असा सल्ला आरोग्यविषयक सल्लागार टी.के. जोशी यांनी दिला आहे. 

कलम ३७० मध्ये आम्ही १२ वेळा बदल केले पण वाद झाला नाही - काँग्रेस

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Experts believe those living closest to the streets are at the highest risk of suffering from health problems