पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रयोग दरवेळी यशस्वी होतातच असे नाही - अखिलेश यादव

अखिलेश यादव

उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाशी आघाडी करण्याची कृती एक प्रयोग होता आणि प्रयोग प्रत्येकवेळी यशस्वी होतातच असे नाही, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीतील दोन्ही पक्षांच्या आघाडीला मायावती यांनी ब्रेक लावला आहे. उत्तर प्रदेशातील आगामी पोटनिवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचे मायावती यांनी जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी ही भूमिका मांडली.

आघाडी नाही तर नाही... आम्ही सुद्धा स्वतंत्र लढण्यास तयार, अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया

अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, मी म्हैसूरमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे मला हे चांगले माहिती आहे की प्रत्येक प्रयोग यशस्वी होतोच असे नाही. पण तरीही आम्ही एक प्रयोग करून पाहिला. त्यातून आम्ही कुठे कमी पडतोय, हे सुद्धा आमच्या लक्षात आले. एएनआयने ही माहिती दिली आहे.

मायावती यांच्याबद्दल असलेला आदर पुढील काळातही कायम राहिल. मला ज्याबद्दल आदर आहे. त्याबद्दल मायावती यांनाही आदर आहे. त्यावेळच्या मतावर मी आजही कायम असल्याचे त्यांनी सांगितले. समाजवादी पक्षाशी असलेली आघाडी कायमची तोडली नसल्याचे मायावती यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही फक्त अल्पविराम घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे भविष्यातील सर्व मार्ग त्यांनी उघडे ठेवले आहेत.

आघाडीवर भरवसा ठेवू नका, मायावतींचे पुन्हा एकला चलो रे...

उत्तर प्रदेशातील ११ पोटनिवडणुकीत आम्ही स्वतंत्रपणे आमचे उमेदवार उभे करणार असल्याचे अखिलेश यादव यांनी सांगितले. २०२२ च्या निवडणुकीत काय रणनिती आखायची हे पक्ष नंतर ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्हा दोघांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. माझ्या मायावती यांना शुभेच्छा आहेत, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.