पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचं केंद्रबिंदू असलेल्या वुहानमध्ये ७६ दिवसांनी हटवलं लॉकडाऊन

वुहान

चीनच्या वुहान प्रांतातून सुरु झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग बघता बघता जगभरात पसरला. आज इथून सुरु झालेल्या संकटानं बघता बघता इटली, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, भारत सारख्या देशांना आपल्या जाळ्यात ओढलं. भारत वगळता वरील अन्य देशांत परिस्थिती फारच बिकट आहे. चीनमधली परिस्थिती आता आटोक्यात आली आहे,  जिथून या संकटाला सुरुवात झाली त्या वुहानमध्ये  ७६ दिवसांनी बुधवारी सकाळी लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. त्यामुळे इथल्या लोकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आता इथलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. 

 

जागतिक आरोग्य संघटना पक्षपाती, डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप

जानेवारी महिन्यात वुहान पूर्णपण सील करण्यात आलं होतं. इथल्या ५० हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली होती.  तर एकट्या वुहानमध्ये अडीच हजार  लोकांचा मृत्यू झाला होता. चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूपैकी ८०%  मृत्यू हे वुहानमध्ये झाले आहेत. लॉकडाऊन हटवल्यानंतर वुहानमध्ये अडकलेले जवळपास ५० हजार लोक बाहेर पडण्याची आणि आपापल्या घरी परतण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची नमती भूमिका, भारताच्या भूमिकेला पाठिंबा

बुधवारी मध्यरात्री लॉकडाऊन हटवण्यात आलं, त्यामुळे वुहानमधील १ कोटीहून अधिक लोकांनी आनंद साजरा केला. अनेक ठिकाणी डिजिटल जाहिरातींच्या बोर्डवर कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर आणि सेवाकर्मींचे आभार मानण्यात आले.