पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EXIT POLL: उमर अब्दुल्ला म्हणतात, आता टीव्ही बंद करण्याची वेळ आली

उमर अब्दुल्ला  (Waseem Andrabi/ Hindustan Times)

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या आणि सातव्या टप्प्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज बाहेर येण्यास सुरुवात झाली. बहुतांश एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलवरुन विविध राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली असताना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी टि्वट केले आहे. प्रत्येक एक्झिट पोल चुकीचे ठरु शकत नाही. वेळ आली टीव्ही बंद करण्याची आणि सोशल मीडियातून लॉग आऊट होऊन २३ मेची वाट पाहण्याची. आता पाहुयात संपूर्ण जग त्यादिवशीही यावरच फिरत असेल.

उमर अब्दुल्लांनी एक्झिट पोल आल्यानंतर लगेचच हे टि्वट केले होते. बहुतांश सर्व पोल्सनुसार एनडीएचे सरकार सहज सत्तेवर येईल. सीएनएन आणि आयपीएसओएसने केलेल्या सर्व्हेनुसार एनडीएला ३३६, यूपीएला ८२ आणि इतरांना १२४ जागा मिळण्याची शक्यता आहे. एबीपी आणि नेल्सनच्या सर्व्हेनुसार एनडीए २६७, यूपीए १२७ आणि इतरांना १४८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

Lok Sabha election 2019 Exit Poll: बहुतांश एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा 'नमो-नमो'

रिपब्लिक टीव्ही-सी व्होटरच्या सर्व्हेनुसार एनडीए २८७, यूपीए १२८, महाआघाडी ४० आणि इतरांना ८७ जागा मिळण्याची शक्यता आहे. रिपब्लिक जन की बातनुसार भाजप ३०५ हून अधिक, यूपीएला १२४ आणि इतरांना ११३ जागा मिळू शकतात. 

१९९८ ते २०१४ : एक्झिट पोल किती बरोबर किती चुकीचे ठरले...

टाइम्स नाउच्या सर्व्हेत एनडीएला ३०६, यूपीएला १४२ तर इतरांना ९४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. न्यूज नेशननुसार एनडीएला २८२-२९०, यूपीएला ११८ ते १२६ आणि इतरांना १३० ते १३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.