पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींच्या आवाहनाला पाकिस्तान वगळता सार्कच्या सर्व देशांचा पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनेच्या (सार्क) सदस्य देशांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला पाकिस्तान वगळता सर्वच देशांनी पाठिंबा दिला आहे. कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी एक मजबूत आणि संयुक्त रणनीती बनवायला हवी. आपल्या देशाच्या नागरिकांना सुदृढ ठेवण्यासाठी आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करुन जगाला एक संदेश देता येईल, असे मोदींनी म्हटले होते. 

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८१ वरः आरोग्य मंत्रालय

पंतप्रधान मोदींची ही सूचनेचे पाकिस्तान वगळता बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव आणि अफगाणिस्तानने स्वागत केले आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली म्हणाले की, आमचे सरकार सार्कच्या सदस्य देशांबरोबर कोरोनावर काम करण्यासाठी तयार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेचे स्वागत करतो. 

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे म्हणाले की, त्यांचा देश कोरोनाविरोधातील लढाईत संयुक्त चर्चेस तयार आहे. त्यासाठी मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. श्रीलंका चर्चा करण्यास आपले अनुभव सांगण्यास आणि सार्कच्या सदस्य देशांपासून शिकण्यास तयार आहे. आपल्या जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करायला हवे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद

त्याचबरोबर भूतान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनीही कोरोनाविरोधातील लढाईसाठी आपल्या सहभागाला मान्यता दिली आहे.