पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरुण जेटलींची प्रकृती चिंताजनक, दिग्गज नेते रुग्णालयात

अरुण जेटली

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जेटली यांना ९ ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नाही. जेटली यांची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे रुग्णालयात गेले होते. त्याचबरोबर भाजपचे अनेक नेते आणि खासदारही रुग्णालयात येत आहेत. १० ऑगस्टनंतर जेटलींच्या आरोग्याबाबत कोणतेही मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलेले नाही. 

बसपा प्रमुख मायावती आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश मिश्रा यांनीही एम्स रुग्णालयात धाव घेतली. शनिवारी सकाळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे रुग्णालयात आले होते. शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन हेही एम्समध्ये येऊन गेले होते. शहा हे एक तासांहून अधिक काळ एम्समध्ये होते. तत्पूर्वी, शुक्रवारी सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे एम्स रुग्णालयात दाखल झाले होते. 

गरोदर स्त्रीला आशीर्वाद द्यायला आलेल्या तृतीयपंथीयांनी नवऱ्याला लुटले!

गेल्या अनेक दिवसांपासून जेटली हे आजारी आहेत. त्यांनी मधुमेह आहे. त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कर्करोग झाल्याचे समजल्यानंतर उपचारासाठी त्यांना अमेरिकेत हलवण्यात आले होते. यापूर्वी वजन कमी करण्यासाठी त्यांच्यावर बॅरिएट्रिक शस्त्रक्रियाही झालेली आहे. 

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थ मंत्रालय सांभाळणाऱ्या जेटलींनी प्रक्रती अस्वास्थ्यामुळे मोदी सरकार २.० मध्ये मंत्रिपद स्वीकारले नव्हते. जेटली हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही केंद्रीय मंत्री होते.